Jataayu

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आधी काही वर्षे संजीवन समाधी घेतली होती शिवयोगी सिद्धरामांनी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष, शिवयोगी सिद्धराम. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या र्शमदानातून तलाव खोदले, गरीब व निरार्शितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम समाजसुधारक, योगी तसेच एक संवेदनशील भावकवीही होते. अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले. कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की, केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणली होती, म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून 68 हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील 1300 वचनेच उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते व तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते. दरवर्षी मकरसंक्रांतीला सोलापुरात शिवयोगी सिद्धरामांची यात्रा भरते. गड्डा यात्रा नावाने ही यात्रा प्रसिद्ध आहे. नंदीध्वजांची नयनरम्य मिरवणूक निघते.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे असे दिसते प्रतिबिंब

23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे. अंदमानला जाण्यापूर्वी त्यांच्या ज्या गोष्टी जप्त करून लिलाव करण्यात आल्या त्यात राजयोग हा ग्रंथही होता. 1912 च्या डिसेंबरमध्ये त्यांचा लहान भाऊ नारायण यांनी त्यांना निवडक पुस्तके पाठवली. त्यात विवेकानंदांचे ग्रंथ बघून प्रसन्नता व्यक्त करणारे पत्र त्यांनी पाठवले होते. सावरकरांनी तुरुंगातच अधिकार्‍यांची संमती घेऊन दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय थाटले होते. ‘त्या ग्रंथालयात मासिके आणि विवेकानंदांची, रामकृष्णांची चरित्रे आणि ग्रंथ यांच्या तर किती प्रती होत्या ते पुसूच नये.’ असे म्हणतात. ते आपल्या आत्मकथेत लिहितात, ‘1898-99 च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली.. त्यांच्या ग्रंथांमुळेच गणेश सावरकर यांच्या मनात हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी अतुट आस्थेचा उदय होत होता. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणाही यातूनच मिळत होती.’ स्वामी विवेकानंदांची अशी इच्छा होती की, ज्या लोकांनी हिंदूधर्म सोडून परधर्माचे अवलंबन केले आहे, त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचा प्रयत्न व्हावा. तसेच धर्मांतरण थांबवण्यात यावे. सावरकरांनी या दिशेनेही बरेच कार्य केले. अंदमानात फसवून धर्मांतर केलेल्या मुलाला पुन्हा हिंदू करताना सावरकरांनी विवेकानंदांचा दाखला दिला होता. सावरकरांच्या जीवनचरित्राचे अवलोकन करताना ध्यानात येते की, त्यांचे जीवन हे विवेकानंदांच्या विचारांचे कृतिशील रूप होते. विवेकानंदांनी जाहीरपणे सांगितले की, ‘तूर्तास, बासरी वाजवणार्‍या र्शीकृष्णाला दूर ठेवून गीतेमधील सिंहाप्रमाणे गर्जना करणार्‍या र्शीकृष्णाची तुम्ही पूजा करा.. गुळगुळीत योजनांपेक्षा तुमच्या ‘रक्तातील धमक’ आणि नसानसांतून वाहणार्‍या पोलादी ताकदीची खरी गरज आहे.’ सावरकरांच्या जीवनात याच विचारांचे प्रतिबिंब दिसत नाही काय?

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून

देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रवाद या विषयावर देशातील 30 हून अधिक विचारवंतांचा सहभाग घेऊन राष्ट्रवाद 360 अंशातून या विशेष ग्रंथाची निर्मिती जटायु अक्षरसेवा ने केली. महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ठसा उमटवणारी ही निर्मिती आहे. सत्यासाठी प्राण पणास लावणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा जटायु आमच्या आदर्शस्थानी आहे. केवळ अन्याय रोखणे याच एकमेव उद्देशाने जटायु पुढे सरसावला. शक्तिशाली असलेल्या रावणाशी कडवी झुंज दिली. आपल्या पश्चात आपल्या आप्त – स्वकियांचे काय होईल, याचीही फिकीर केली नाही. सर्वोच्च त्यागाचे हे उदाहरण आहे. जटायुसाठी माणुसकीची भावना महत्त्वाची होती . मानवतेचे सर्वोच्च कल्याण व्हावे, याविषयी सर्वांचे एकमत असते. परंतु, ते कोणत्या मार्गाने व्हावे याविषयी मात्र टोकाची मत – मतांतरे आहेत. ही मतभिन्नता प्रसंगी इतक्या टोकाला जाते की, त्यातून संघर्ष उद्भवतो. अशा प्रकारचा संघर्ष हेच आज मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. संपूर्ण मानवतेलाच धोका उत्पन्न होईल की काय, अशी स्थिती यातून उद्भवली आहे. _ _ मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. सध्या जगभरात ही संकल्पना वादाची ठरताना दिसत आहे. भारतातही राष्ट्र या संकल्पनेबद्दल टोकाचे मतभेद आहेत. पाश्चात्य आणि भारतीय संकल्पनेत टोकाची भिन्नता आहे. यातून विविध विचारगट आमनेसामने उभे ठाकले आहेत. वास्तविक पहाता कोणत्याही देशाच्या दृष्टीने राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. आपला प्रिय देश भारतही याला अपवाद नाही. आपल्या भारतवर्षाला किमान १० हजार वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या ऋषी – मुनींनी राष्ट्र ही संकल्पना विकसित केली. याचे शेकडो दाखले आपल्या प्राचीन ग्रंथांत आहेत. काळाच्या ओघात अनेक राष्ट्रे उदयास आली अन् लुप्तही झाली. भारतवर्ष त्याला अपवाद आहे. संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक ठरेल अशी जीवनपद्धती येथे विकसित झाली. मानवतेचे कल्याण करणारे विचार जगाला द्यायचे असतील तर भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे आणि राष्ट्र या संकल्पनेबद्दल समाजात संभ्रमाची भावना असणे हिताचे नाही. म्हणूनच “राष्ट्रवाद : ३६० अंशातून ‘ या ग्रंथाची योजना केली. या ग्रंथामुळे वाचकाला आपली भूमिका ठरवणे सोपे जाईल, याचा आम्हाला विश्वास वाटतो. पृष्ठे : २२४, मूल्य : ३००/- प्रकाशक : जटायु अक्षरसेवा

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शक्तीशाली विचार सर्वसामान्यांपर्यंत कधी आलेच नाहीत

ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही. आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही “एक राष्ट्र’ म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण “अखंड हिंदस्थान’च आपल्या हिताचा वाटू लागेल. माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे. जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे. देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो. कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे. शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते. पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील. माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत “बहिष्कृत भारता’चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या. मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही. अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- “काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल. ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो. तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको. राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व

वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे, असे स्वामी विवेकानंद का म्हणाले, जाणून घेऊया…

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच विवेकानंद पुण्यतिथीच्या निमित्ताने शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही… जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला. शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं. हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता. अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल. दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

जटायु अक्षरसेवासाठी गौरवाची बाब

देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना सोलापूरची अमूल्य भेट म्हणून श्रीमंती सोलापूरची हा ग्रंथ सुपूर्द करण्यात आला. जटायु अक्षरसेवासाठी ही बाब गौरवाची आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेने सोलापूरच्या बलस्थानांवर आधारित कॉफी टेबल बुक (विशेष ग्रंथ) निर्मितीची जबाबदारी जटायु अक्षरसेवा कडे सोपवली. दर्जेदार कंटेट… स्क्रीप्ट रायटिंग, विषयांची निवड, छायाचित्रण, संपादन, छपाई, बांधणी या अनेक आघाड्या सांभाळत जटायु अक्षरसेवा ने श्रीमंती सोलापूरची निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आणि ठरलेल्या वेळेआधी ग्रंथनिर्मिती पूर्ण केली.

ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र

वंदे मातरम्या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा धर्मांच्या आधारे केलेली या देशाची-बंगालची फाळणी रद्द झाली. वंदे मातरम्ला अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या भारतवर्षाचे तुकडे पडले. आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांग्लादेश उगवले. या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् या महामंत्रात आहे… मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणार्‍या बंकिमचंद्रांचे जीवनकार्य ॠषीतुल्य आहे. आजच्या पिढीला प्रेरक आहे. वंदे मातरम्चे उद्गाते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या स्मृतीला 125 वर्षे झाल्यानिमित्त त्यांची जीवनगाथा प्रसिध्द होत आहे.. ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र लेखक: मिलिंद सबनीस Pages 225, Price Rs. 250/- भारतीयत्व जागवणारे महान नायक बंकिमचंद्र यांचे प्रेरक चरित्र बाल आणि तरुणांत मोठ्या प्रमाणात पसरावं असं तुम्हालाही वाटतं? ग्रंथालय निधी योजनेत आपले स्वागत आहे… आपल्या योगदानातून महाराष्ट्रातील सुमारे 12,858 वाचनालये, 40 हजार ग्रामपंचायतींपर्यंत ॠषी बंकिम पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं आणि अन्य शैक्षणिक संस्थांतील तरुणाईपर्यंत हे चरित्र पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेत सढळ हाताने योगदान देण्यासाठी विनम्र आवाहन करीत आहोत!

Scan the code