Art

Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनात स्वामी विवेकानंद यांचे असे दिसते प्रतिबिंब

23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे. अंदमानला जाण्यापूर्वी त्यांच्या ज्या गोष्टी जप्त करून लिलाव करण्यात आल्या त्यात राजयोग हा ग्रंथही होता. 1912 च्या डिसेंबरमध्ये त्यांचा लहान भाऊ नारायण यांनी त्यांना निवडक पुस्तके पाठवली. त्यात विवेकानंदांचे ग्रंथ बघून प्रसन्नता व्यक्त करणारे पत्र त्यांनी पाठवले होते. सावरकरांनी तुरुंगातच अधिकार्‍यांची संमती घेऊन दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय थाटले होते. ‘त्या ग्रंथालयात मासिके आणि विवेकानंदांची, रामकृष्णांची चरित्रे आणि ग्रंथ यांच्या तर किती प्रती होत्या ते पुसूच नये.’ असे म्हणतात. ते आपल्या आत्मकथेत लिहितात, ‘1898-99 च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली.. त्यांच्या ग्रंथांमुळेच गणेश सावरकर यांच्या मनात हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी अतुट आस्थेचा उदय होत होता. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणाही यातूनच मिळत होती.’ स्वामी विवेकानंदांची अशी इच्छा होती की, ज्या लोकांनी हिंदूधर्म सोडून परधर्माचे अवलंबन केले आहे, त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचा प्रयत्न व्हावा. तसेच धर्मांतरण थांबवण्यात यावे. सावरकरांनी या दिशेनेही बरेच कार्य केले. अंदमानात फसवून धर्मांतर केलेल्या मुलाला पुन्हा हिंदू करताना सावरकरांनी विवेकानंदांचा दाखला दिला होता. सावरकरांच्या जीवनचरित्राचे अवलोकन करताना ध्यानात येते की, त्यांचे जीवन हे विवेकानंदांच्या विचारांचे कृतिशील रूप होते. विवेकानंदांनी जाहीरपणे सांगितले की, ‘तूर्तास, बासरी वाजवणार्‍या र्शीकृष्णाला दूर ठेवून गीतेमधील सिंहाप्रमाणे गर्जना करणार्‍या र्शीकृष्णाची तुम्ही पूजा करा.. गुळगुळीत योजनांपेक्षा तुमच्या ‘रक्तातील धमक’ आणि नसानसांतून वाहणार्‍या पोलादी ताकदीची खरी गरज आहे.’ सावरकरांच्या जीवनात याच विचारांचे प्रतिबिंब दिसत नाही काय?

राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून

देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रवाद या विषयावर देशातील 30 हून अधिक विचारवंतांचा सहभाग घेऊन राष्ट्रवाद 360 अंशातून या विशेष ग्रंथाची निर्मिती जटायु अक्षरसेवा ने केली. महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ठसा उमटवणारी ही निर्मिती आहे. सत्यासाठी प्राण पणास लावणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा जटायु आमच्या आदर्शस्थानी आहे. केवळ अन्याय रोखणे याच एकमेव उद्देशाने जटायु पुढे सरसावला. शक्तिशाली असलेल्या रावणाशी कडवी झुंज दिली. आपल्या पश्चात आपल्या आप्त – स्वकियांचे काय होईल, याचीही फिकीर केली नाही. सर्वोच्च त्यागाचे हे उदाहरण आहे. जटायुसाठी माणुसकीची भावना महत्त्वाची होती . मानवतेचे सर्वोच्च कल्याण व्हावे, याविषयी सर्वांचे एकमत असते. परंतु, ते कोणत्या मार्गाने व्हावे याविषयी मात्र टोकाची मत – मतांतरे आहेत. ही मतभिन्नता प्रसंगी इतक्या टोकाला जाते की, त्यातून संघर्ष उद्भवतो. अशा प्रकारचा संघर्ष हेच आज मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. संपूर्ण मानवतेलाच धोका उत्पन्न होईल की काय, अशी स्थिती यातून उद्भवली आहे. _ _ मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. सध्या जगभरात ही संकल्पना वादाची ठरताना दिसत आहे. भारतातही राष्ट्र या संकल्पनेबद्दल टोकाचे मतभेद आहेत. पाश्चात्य आणि भारतीय संकल्पनेत टोकाची भिन्नता आहे. यातून विविध विचारगट आमनेसामने उभे ठाकले आहेत. वास्तविक पहाता कोणत्याही देशाच्या दृष्टीने राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. आपला प्रिय देश भारतही याला अपवाद नाही. आपल्या भारतवर्षाला किमान १० हजार वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या ऋषी – मुनींनी राष्ट्र ही संकल्पना विकसित केली. याचे शेकडो दाखले आपल्या प्राचीन ग्रंथांत आहेत. काळाच्या ओघात अनेक राष्ट्रे उदयास आली अन् लुप्तही झाली. भारतवर्ष त्याला अपवाद आहे. संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक ठरेल अशी जीवनपद्धती येथे विकसित झाली. मानवतेचे कल्याण करणारे विचार जगाला द्यायचे असतील तर भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे आणि राष्ट्र या संकल्पनेबद्दल समाजात संभ्रमाची भावना असणे हिताचे नाही. म्हणूनच “राष्ट्रवाद : ३६० अंशातून ‘ या ग्रंथाची योजना केली. या ग्रंथामुळे वाचकाला आपली भूमिका ठरवणे सोपे जाईल, याचा आम्हाला विश्वास वाटतो. पृष्ठे : २२४, मूल्य : ३००/- प्रकाशक : जटायु अक्षरसेवा

Scan the code