आपल्या भारतवर्षाला किमान 10 हजार वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाची कामना करणार्या ऋषी-मुनींनी राष्ट्र ही संकल्पना विकसित केली. याचे शेकडो दाखले आपल्या प्राचीन ग्रंथांत आहेत. काळाच्या ओघात अनेक राष्ट्रे उदयास आली अन् लुप्तही झाली. भारतवर्ष त्याला अपवाद आहे. संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक ठरेल अशी जीवनपद्धती येथे विकसित झाली. मानवतेचे कल्याण करणारे विचार जगाला द्यायचे असतील तर भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे आणि राष्ट्र या संकल्पनेबद्दल समाजात संभ्रमाची भावना असणे हिताचे नाही. म्हणूनच ‘राष्ट्रवाद : 360 अंशातून’ या ग्रंथाची योजना केली. या ग्रंथामुळे वाचकाला आपली भूमिका ठरवणे सोपे जाईल, याचा आम्हाला विश्वास वाटतो.
ग्रंथातील विषय अणि मान्यवर लेखक
- राष्ट्रवाद : पाश्चात्य व भारतीय / पी. परमेश्वरन्
- बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा राष्ट्रवाद / मिलिंद सबनीस
- कृष्ण, चाणक्य ते छत्रपती शिवाजी महाराज / विवेक घळसासी
- स्वामी दयानंद यांचा राष्ट्रवाद / श्रीपाद जोशी
- स्वामी विवेकानंद व राष्ट्रवाद / स्वर्णलता भिशीकर
- संवैधानिक राष्ट्रवाद / रमेश पतंगे
- रा. स्व. संघ आणि ‘राष्ट्र’ संकल्पना / मा. गो. वैद्य
- मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद / अजित अभ्यंकर
- नेहरूंचा राष्ट्रवाद / राज कुलकर्णी
- सरदार पटेल यांचा कृतिशील राष्ट्रवाद / मकरंद मुळे
- इस्लाम, राष्ट्रवाद आणि भारत / भाऊ तोरसेकर
- बाळासाहेबांचा प्रखर राष्ट्रवाद / शिवरत्न शेटे
- विद्यार्थी आणि राष्ट्रवाद / अरुण करमरकर
- दैनंदिन जीवनात राष्ट्रभक्ती / हेमंत महाजन
- वाट पाहतो स्वातंत्र्याची / मुकुल कानिटकर
- बॉलीवूड आणि राष्ट्रवाद / जयेश मेस्त्री
- सनातन संस्थेच्या दृष्टीने राष्ट्रवाद / रमेश शिंदे
- ईशान्य भारत व राष्ट्रवाद / प्रसाद चिकसे
- पुरातत्त्वशास्त्र, सिंधूसंस्कृती आणि राष्ट्रवाद / माया पाटील
- डॉ. आंबेडकर आणि राष्ट्रवाद / एम. आर. कांबळे
- राष्ट्रवाद नव्हे राष्ट्रीयता / लखेश्वर चंद्रवंशी
- गांधीजींचा राष्ट्रवाद / अरुण खोरे
- एकात्मतेचा विजय / तरुण विजय
- सावरकरांचा राष्ट्रवाद भाग – 1 / अक्षय जोग
- सावरकरांचा राष्ट्रवाद भाग – 2 / संतोष शेलार
- दीनदयाळ व राष्ट्रवाद / सिद्धाराम पाटील
- पाश्चिमात्य जगातील राष्ट्रवाद / अभिराम दीक्षित
- काँग्रेस आणि राष्ट्रवाद / उल्हास पवार
- राष्ट्रवादाचे व्यावहारिक रूप / तुफेल अहमद
- प्रणव मुखर्जी यांचे राष्ट्रचिंतन / सिद्धाराम पाटील
- भारतवर्षाचे पाडले सात तुकडे / इंद्रेश कुमार
Reviews
There are no reviews yet.