Sale!

ऋषी बंकिमचंद्र

499.00

राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावरील मराठीत प्रकाशित झालेले पहिले चरित्र. मागील १२८ वर्षांत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावर मराठीतून एकही चरित्र प्रसिद्ध झाले नव्हते.

ग्रंथाचे नाव : ऋषी बंकिमचंद्र
लेखक  : मिलिंद सबनीस
प्रस्तावना : विवेक घळसासी
प्रकाशक :  जटायु अक्षरसेवा
पृष्ठे : सुमारे 240

COD साठी संपर्क 9767284038

ऋषी बंकिमचंद्र !
राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे मराठीतील पहिले चरित्र.
वंदे मातरम् या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा धर्माच्या आधारे केलेली या देशाची-बंगालची फाळणी रद्द झाली… वंदे मातरम ला अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या भारतवर्षाचे तुकडे पडले… आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांगलादेश उगवले…
या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् महामंत्रात आहे. मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणार्‍या बंकिमचंद्रांचे जीवनकार्य ऋषीतुल्य आहे. बाल-युवा पिढीला प्रेरक आहे.
भारतीयत्व जागवणारे महान लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या निर्वाणाला 125 वर्षे होऊन गेली. स्वातंत्र्यानंतरही मराठी भाषेत त्यांचे प्रेरक चरित्र लिहिले गेले नाही. वंदे मातरम्चे अभ्यासक श्री. मिलिंद सबनीस यांना ‘जटायु अक्षरसेवा’ने ही उणीव दूर करण्याची विनंती केली आणि त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘ऋषी बंकिमचंद्र’ हा चरित्रग्रंथ साकार झाला.

ऋषी बंकिमचंद्र – स्वातंत्र्य लढ्याचा प्राणमंत्र आणि भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम्चे जनक !! पण सतत पाच पिढ्यांसमोर त्यांचे तेजस्वी चरित्र आलेच नाही.
शिक्षकांपर्यंत पोहोचले नाही, मग विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचणार? आजचे विद्यार्थी हे उद्याचे शिक्षक.. उद्याचे लेखक, पत्रकार, विचारवंत.
पण त्यांच्यापर्यंत ऋषी बंकिम पोहोचलेच नाहीत. तब्बल 128 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. जटायु अक्षरसेवाने प्रकाशित केले.
ऋषी बंकिमचंद्र – मराठीतील पहिले स्वतंत्र चरित्र.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Open chat
Scan the code
Order Now