Sale!

योगदीप : योगमय जीवनाची १०० सूत्रे

150.00

दोन तप योगसाधना आणि योग अध्यापन करणारे अभ्यासक श्री. धनंजय सूर्यवंशी यांनी लिहिलेले सुमारे सव्वाशे पानांचे पुस्तक जागतिक योग दिनानिमित्त २१ जून २०२२ रोजी जटायु अक्षरसेवाने प्रकाशित केले आहे.

पुस्तकाचे नाव : योगदीप – योगमय जीवनाची १०० सूत्रे
लेखक : धनंजय सूर्यवंशी
प्रकाशक : जटायु अक्षरसेवा
पृष्ठे : सुमारे १२५

हे पुस्तक आपल्या घरी हवेच, कारण…

मुलांनाही समजेल अशी सोपी भाषा
प्रत्येक पानावर 100 शब्दांचे एक सूत्र
प्रत्येक पानावर एक चित्र
रोज एक पान 2 मिनिटात अभ्यासणे सोपे
भेट देण्यास उपयुक्त
24 तास योग जगण्याची सूत्रे

यामध्ये १०० विविध विषयी अगदी १००-१०० शब्दांत
सचित्र मांडले आहेत. हे मौल्यवान विषय पुढीलप्रमाणे …
योग दीप 1 : अनुशासन
योग दीप 2 : श्वासावर लक्ष
योग दीप 3 : पाणी हेच जीवन
योग दीप 4 : लयबद्ध ऊर्जा
योग दीप 5 : आहार
योग दीप 6 : न्याहरी
योग दीप 7 : स्वतःला वेळ द्या
योग दीप 8 : सकारात्मक ऊर्जा
योग दीप 9 : ओंकार उच्चारण
योग दीप 10 : डोळ्यांची काळजी
योग दीप 11 : करूया श्रवणभक्ती
योग दीप 12 : गंध संवेदना
योग दीप 13 : स्पर्शमाध्यम
योग दीप 14 : रामरस
योग दीप 15 : कशासाठी पोटासाठी
योग दीप 16 : आनंददायी झोप
योग दीप 17 : योग्य आहार
योग दीप 18 : श्रेयस प्रेयस
योग दीप 19 : विचार व कृती
योग दीप 20 : हिंसा अहिंसा
योग दीप 21 : स्वत:शी स्पर्धा
योग दीप 22 : सत्य असत्य
योग दीप 23 : सत्याचा मार्ग
योग दीप 24 : दातृत्व
योग दीप 25 : आसक्ती-अनासक्ती
योग दीप 26 : गरज आणि अभिलाषा
योग दीप 27 : निसर्गाची साखळी
योग दीप 28 : नवी पिढी
योग दीप 29 : आपली जीवनपद्धती
योग दीप 30 : शंका निरसन
योग दीप 31 : घराचे घरपण
योग दीप 32 : मनशुद्धी अन् वाणीशुद्धी
योग दीप 33 : मन करा रे प्रसन्न
योग दीप 34 : कर्म करण्यातील आनंद
योग दीप 35 : वर्तमानातील कामांवर लक्ष
योग दीप 36 : जीवनात तप आवश्यक
योग दीप 37 : झापडही आवश्यकच
योग दीप 38 : स्वत:साठी संस्कार
योग दीप 39 : सर्वात जवळचा मित्र
योग दीप 40 : पिढ्यांना जोडणारा धागा
योग दीप 41 : मोठ्यांना करूया वंदन
योग दीप 42 : ‘त्यांचे’ स्मरण ठेवूया
योग दीप 43 : प्रत्येकाचे स्थान मोलाचे
योग दीप 44 : ईश्वर प्रणीधान
योग दीप 45 : गतिमान संतुलन
योग दीप 46 : शरीर संतुलन
योग दीप 47 : स्थिर शरीरात स्थिर मन
योग दीप 48 : श्रद्धा, विश्वास व सातत्य
योग दीप 49 : खोल आणि दीर्घ श्वसन
योग दीप 50 : नियमबद्ध जगणे
योग दीप 51 : षड्रीपूंवर नियंत्रण
योग दीप 52 : आहार आणि विहार
योग दीप 53 : कल्याणकारी ऐकूया
योग दीप 54 : डोळ्यांची काळजी
योग दीप 55 : घ्राणेंद्रियाची क्षमता
योग दीप 56 : नमस्कार मुद्रा
योग दीप 57 : पंच महाभुतांशी योग
योग दीप 58 : सूर्यनमस्कार
योग दीप 59 : उभे राहून योगासने
योग दीप 60 : बसून योगासने
योग दीप 61 : ध्यानात्मक आसने
योग दीप 62 : पोटावरील आसने
योग दीप 63 : पाठीवरील व इतर आसने
योग दीप 64 : शवासन
योग दीप 65 : स्थिर सुख आसनं
योग दीप 66 : शुद्धी क्रिया
योग दीप 67 : जलनेती
योग दीप 68 : कपालभाती
योग दीप 69 : डोळ्यांचे व्यायाम
योग दीप 70 : त्राटक
योग दीप 71 : फुफ्फुस क्षमता वाढवता येते
योग दीप 72 : योगिक श्वसन
योग दीप 73 : ईडा, पिंगला व सुषूम्ना
योग दीप 74 : चंद्र नाडी
योग दीप 75 : सूर्य नाडी
योग दीप 76 : षटचक्रे
योग दीप 77 : अनुलोम विलोम
योग दीप 78 : चंद्र भेदन
योग दीप 79 : सूर्य भेदन
योग दीप 80 : ध्यानाची तयारी
योग दीप 81 : प्राणायामचा पाया
योग दीप 82 : दीर्घ श्वसन
योग दीप 83 : कुंभक
योग दीप 84 : बंध व मुद्रा
योग दीप 85 : मूलबंध
योग दीप 86 : उड्डीयान बंध
योग दीप 87 : जालंधर बंध
योग दीप 88 : भस्त्रिका प्राणायाम
योग दीप 89 : उज्जायी प्राणायाम
योग दीप 90 : शीतली प्राणायाम
योग दीप 91 : सीत्कारी, सदंत
योग दीप 92 : भ्रामरी
योग दीप 93 : षन्मुखी मुद्रा
योग दीप 94 : अष्टांग योग
योग दीप 95 : दिवसाची सुरूवात
योग दीप 96 : धारणा
योग दीप 97 : ध्यान
योग दीप 98 : पाठ, मान, डोके सरळ
योग दीप 99 : पेराल तसे उगवेल
योग दीप 100 : खरी समाधी

‘जटायु अक्षरसेवा’चे योग विषयावरील हे पुस्तक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. सन 2015 मध्ये 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर योग दिन म्हणून घोषित झाला. तेव्हापासून संपूर्ण जगभरात योगाविषयीची जिज्ञासा मोठ्या प्रमाणात वाढली. योग आहे तरी काय, हे मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. योगामुळे आपल्या रिलीजन किंवा मजहबला धक्का पोहोचेल या भीतीपोटी सुरुवातीला काही प्रमाणात विरोधाचा सूरही उमटतला. पण योग हा कट्टरतावादी किंवा संकुचित नाही. तो ईश्वराचे एक विशिष्ट नाव किंवा रूपाबद्दल सांगत नाही. तो आदेश किंवा फतवे काढत नाही. मतांतरण करत नाही, हे ध्यानात आल्यानंतर तो विरोधही मूठभर कट्टरपंथी गटांपुरता मर्यादित बनून राहिला. योगसाधनेने जीवन ईश्वराशी लीन होते, पावित्र्याने भरून जाते. योग तत्त्वज्ञान विकसित झाले तेव्हा जगात आजच्याप्रमाणे एकांतिक पंथांचा उदय झालेला नव्हता. त्यामुळे योग हा विशिष्ट पंथाच्या (रिलिजन) लोकांना समोर ठेवून विकसित झालेला नाही. योग हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे. भगवद्गीता हा योगशास्त्रावरील सर्वोच्च ग्रंथ आहे. संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाचा विचार करणार्‍या हिंदू धर्म आणि हिंदू धर्मग्रंथ यापासून योग भिन्न नाही. योग ही सार्थक आणि आनंदी जीवन जगण्याची कला आहे. ‘योगशास्त्रातील ज्ञान हे लहान मुलांनाही समजले पाहिजे, अशा रीतीने त्याची मांडणी करणे हा माझ्या जीवनाचा हेतू आहे’, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते. योगसाधक धनंजय सूर्यवंशी यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक त्या दिशेने जाणारा एक प्रयत्न आहे.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code