Sale!

मी पत्रकार अरविंद जोशी; जसा घडलो तसा

200.00

पत्रकार अरविंद जोशी हे एक बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आहे. ते सोलापूर तरुण भारतचे संपादक होते. अत्यंत सामान्य घरात जन्मलेल्या अरविंद जोशी यांचे जीवन अतिशय प्रेरक आहे. याबद्दल ज्येष्ठ लेखक सदानंद मोरे म्हणतात, ”आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आणि परिपूर्ण माणूस घडण्यासाठी हे आत्मचरित्र दिशादर्शक आहे.”

पृष्ठ संख्या 212
मूळ किंमत 300 रुपये
स्वागत मूल्य 200 रुपये

हे आत्मचरित्र वाचणाऱ्यावर सकारात्मक परिणाम घडवणारे आहे. त्यामुळेच सुयश गुरूकुलचे संस्थापक प्रा. केशव शिंदे म्हणतात, ”हे आत्मचरित्र विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे.”
मराठीतील नामवंत लेखक शरणकुमार लिंबाळे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेत ते लिहितात, ”समाजातल्या सामान्य माणसाचे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि सामान्यातून असामान्य होण्यासाठी केलेले भगिरथ परिश्रम जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन वाचले पाहिजे. अरविंद जोशी यांच्या लेखनाचा मूळ उद्देश आपण कसे जगलो हे जसे सांगणे आहे, तसे तुम्ही कसे जगू शकता याचे प्रशिक्षण देण्याच्या कार्यशाळेसारखे आहे. लेखकाचे आयुष्य हे एका प्रयोगशाळेसारखे आहे. जीवनाचे अनेक यशस्वी प्रयोग करणारा हा जादुगार आहे. विवंचना, प्रतारणा आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चारचौघांपेक्षा वेगळे आयुष्य जगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. अरविंद जोशी यांचे जगणे म्हणजे आत्मविश्वासाची भव्य यात्रा वाटते. लेखकाच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहिले तर प्रचंड न्यूनगंडावर मात करून अमर्याद आत्मविश्वास मिळवणार्‍या पहाडाचे दर्शन घेण्यासारखे वाटते. सतत नवीन आव्हाने स्वीकारून लेखक जगला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांना आत्मविश्वासाचे भान देण्याचे शेकडो प्रयत्न केले आहेत.”

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code