Sale!

Hoy Mi Dev Pahilay

250.00

होय, मी देव पाहिलाय! हे श्री. वसंतराव नाईकनवरे यांचे आत्मचरित्र त्या दृष्टीने खूप विचार करायला लावणारे आहे. ते एका मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले. घायपातापासून दोरखंड वळून तयार करणे आणि शेतकर्‍यांना लागतील तसे ते पुरवून त्याच्या बदल्यात बलुते जमा करणे हे त्यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन. या कामातून मिळणार्‍या उत्पन्नाचा विचार केला, तर या कुटुंबातील एखादा मुलगा इंजिनियर होईल आणि 38 वर्षे शासकीय सेवा करून, कार्यकारी अभियंता या पदापर्यंत चढून निवृत्त होईल; हे शक्यच वाटत नाही. आपल्या आसपास अशी कामे करणारे अनेक लोक आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतील मुले शिक्षणात कशी मागे राहतात हे आपण नित्य पाहतच असतो. वसंतराव नाईकनवरे हे त्याला अपवाद ठरले. म्हणून त्यांच्या शिक्षणाची कहाणी वेगळी आहे. त्यांनी आपल्या बालपणी गरिबीचे चटके कसे सहन केले, याच्या कित्येक आठवणी त्यांच्या या आत्मचरित्रात आलेल्या आहेत. त्या आठवणी आपल्या मनाला अस्वस्थ करतात. घरात चार भावंडे आणि भाकरीची दुरडी मोकळी. जेमतेम तीन भावंडांना पुरेल एवढी भाकरी त्या दुरडीत आहे, पण त्यांचा सांभाळ करणार्‍या मोठ्या बहिणीच्या वाट्याला भाकरी येत नाही. आपल्या धाकट्या भावंडांची भाकरी मागून घेऊन आपण खावी, हेही त्या केवळ वयाने मोठ्या असलेल्या चिमुरडीला प्रशस्त वाटत नाही. म्हणून, ती आपल्या भावंडांना थोडी भाकरी लक्ष्मीला ठेवायची आहे, म्हणून मागून घेते. आपण स्वतः चोरून खाते आणि लक्ष्मीने खाल्ली असल्याचा बनाव करते. पण लहान भावंडे तिची चोरी पकडतात. आपल्या बालपणातला हा प्रसंग श्री. नाईकनवरे गंमतीने लिहीत असले, तरी त्यातून त्यांच्या हलाखीच्या जीवनावर चांगलाच प्रकाश पडतो.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code