Sale!

सोलापूरची श्रीमंती 

800.00

किमान 1000 वर्षांचा इतिहास उपलब्ध असलेल्या सोलापूरची श्रीमंती 100 पृष्ठांतून शेकडो छायाचित्रे अणि दुर्मिळ माहितीचा खजिना या कॉफ़ी टेबल बुकमधे आहे. या बुकच्या निर्मितीत ५० हून अधिक अभ्यासक, संपादक यांचा सहभाग होता.

सोलापूर अणि सोलापूर भोवतालच्या २०० किलोमीटर परिसरातील पर्यटन, श्रद्धाकेंद्रे, खाद्य पदार्थ अणि  सर्वकाही

सोलापूर. सोन्नलगी… सोन्नलपूर… आणि शोलापूरसुद्धा. चार हुतात्म्यांचे हे शहर.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षे आधी सोलापूर या शहराने 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगलं. भारतवर्षाच्या इतिहासातील ही रोमहर्षक आणि अद्वितीय घटना. परंतु ही घटना सोलापूरकरांपुरतीच मर्यादित होऊन राहिली. आम्ही सोलापूरबाहेर ही बाब अभिमानाने सांगितलीच नाही.

अमृतसरचे सुवर्णमंदिर जगात प्रसिद्ध आहे. अमृतसरच्या या मंदिराहून किमान 300 वर्षे प्राचीन आहे सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर. तलावाच्या मधोमध विस्तृत मंदिर. तलावात आपले रूपडे न्याहाळणारी भुईकोट किल्ल्याची तटबंदी. मानवी मनाला प्रासादिक आनंद देणारे स्थान. परंतु सोलापूरच्या बाहेर आम्ही हे पोहोचवलेच नाही.

इतकेच नाही तर सोलापूरची खाद्यसंस्कृतीही जगभराच्या खवय्यांना भुरळ घालते. हे आता कुठे आमच्या ध्यानात येत आहे. येत्या काळात श्रद्धाकेंद्रांभोवती फिरणारे पर्यटन हा विकास, समृद्धी आणि मन:शांतीचा आधार ठरणार, हे स्पष्ट होत चालले आहे. अशावेळी आपल्यातील दुर्बलस्थाने शोधून दूर करणे आणि सामर्थ्य देणार्‍या बाबी ओळखणे आवश्यक ठरणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘मणभर वटवटीपेक्षा कणभर कार्य केव्हाही श्रेष्ठ.’ म्हणूनच ‘स्व’चा विस्तार करत कर्मभूमी सोलापूरसाठी काही प्रत्यक्ष कार्य करावं, या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक पर्यटन केंद्रांची सविस्तर माहिती, सोलापूरची खाद्य संस्कृती व विविध उत्पादनांची माहिती सोलापूरबाहेर अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न या कॉफी टेबल बुक मधून केला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code