इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की स्वार्थ बोकाळतो. स्वार्थ बोकाळला की देशभक्ती मागे पडते. देशभक्ती गौण मानणाऱ्यांच्या हाती नेतृत्व आले की देशाचा सत्यानास होतो. याचा दाहक अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे.
वंदे मातरमच्या स्फूर्तीदायी इतिहासाकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षच झाले. त्या इतिहासाची उजळणी व्हावी यासाठी ही मुलाखत येथे सादर करत आहोत.
२००७ साली सोलापुरातील वृत्तदर्शन या स्थानिक टीव्ही वाहिनीवर वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत घेतली होती.