सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक स्मरणिका

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला (डीसीसी) 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन पार्क मैदान येथील भव्य कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी मान्यवर नेते उपस्थित होते. या स्मरणिकेची आकर्षक छपाई करण्याची संधी जटायु अक्षरसेवा ला मिळाली होती.