पृष्ठे : 312.मूल्य : 600/-
25 हून अधिक मान्यवर लेखकांचे योगदान
- डेव्हिड फ्रॉले
- आर.व्ही.एस. मणी
- तुषार दामगुडे
- फ्रॅन्कॉइस गोटियर
- रमेश पतंगे
- विवेक घळसासी
- रवींद्र गोळे
- अभिलाष खांडेकर
- अरुण करमरकर
- हेमंत महाजन
- भाऊ तोरसेकर
- यमाजी मालकर
- सिद्धाराम भै. पाटील
- प्रमोद डोरले
- वेणू धिंगरा
- अरविंद जोशी
- राकेश शेट्टी
- अॅड. के. मंजुनाथ
- प्रसाद चिकसे
- जयेश मेस्त्री
- वा. ना. उत्पात
- मिलिंद कांबळे
- लखेश चंद्रवंशी
- डॉ. अभिराम दीक्षित
अशी आहे ग्रंथाची संकल्पना
भारतवर्षाच्या इतिहासात स्वामी विवेकानंद यांचे एक विशेष स्थान आहे.
काही ठिकाणी त्यांचे वर्णन घनिभूत भारत या समर्पक शब्दावलीत केले आहे.
“मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे…”, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते.
आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणे ठळक होताना दिसत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आपले जीवन घडवले, त्याग आणि सेवा हे भारतवर्षाचे शाश्वत आदर्श ज्यांनी आपली जीवननिष्ठा बनवली, अशी समर्पित व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. देशाच्या विविध क्षेत्रांत क्षमतावान नेतृत्वाला संधी मिळत आहे. नव्या भारताची पायाभरणी सुरू आहे.
अशा वेळी जगद्गुरू भारत (स्वामी विवेकानंद) आणि नवा भारत (नरेंद्र मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, राष्ट्रीयतेचे विविध आयाम समोर यावेत, या दृष्टीने ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा विषय घेऊन विशेष ग्रंथाची निर्मिती केली आहे.
Reviews
There are no reviews yet.