Sale!

वीरशैव लिंगायत हिंदूच !

25.00

खरं तर आपली बाजू सत्याची असताना ती सिद्ध करण्याची वेळ येणं, हे फार वेदनादायी असतं… पण “सत्य घरातून निघण्यासाठी पादत्राणे घालेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेलं असतं”, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सत्य अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याची गरज वाटली आणि हे वेदनादायी पण आवश्यक काम करायचं ठरवलं.
महात्मा बसवण्णा हे थोर समाज सुधारक होते. परंतु त्यांनी कोणत्याही नव्या धर्माची स्थापना केली नाही. ते बाराव्या शतकात होऊन गेले. त्याआधी किमान अडीच हजार वर्षांपासून लिंगायत समाज परंपरा अस्तित्वात असल्याचे सज्जड पुरावे आहेत. शिलालेख आहेत. 
मूलनिवासी या खोट्या कल्पनेच्या आहारी जाऊन काही लोक लिंगायत समाजाला तोडण्यासाठी “लिंगायत हे हिंदू नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्म आहे”, असे थोतांड रचण्याचा प्रयत्न करत आहेत. हा लिंगायत समाजाचा अवमान आहे.
या पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत परंपरा ही हिंदू धर्माचा प्रमुख घटक आहे हे दाखवणारे किमान 37 प्रमुख बिंदू या पुस्तिकेत मांडले आहेत. यातील प्रत्येक बिंदू “स्वतंत्र धर्मवाल्या” मंडळींचे कुतर्क उघडे पाडण्यास समर्थ आहे.
पुस्तकाचे नाव : वीरशैव लिंगायत हिंदूच !
लेखक : सिद्धाराम भैरप्पा पाटील, अप्पासाहेब चंद्रकांत हत्ताळे
पाने : ३६
मूल्य : ३० रुपये

टीप : प्रसारासाठी, वाटप करण्यासाठी ५०, १००, ५०० अशा संख्येत पुस्तके मागवणार असल्यास कृपया 9767284038 या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हाटस् अपवर संदेश पाठवा. आपल्याला संपर्क करता येईल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code